चेन्नई : काम मिळवायचे असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासाठी अगदी सहज तयार होतात. मीडिया हाऊसेसमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शय्यासोबत केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहोचू शकत नाहीत. एवढेच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाही, या आशयाची फेसबुक पोस्ट भाजपाचे नेते एस. व्ही. शेखर यांनी लिहिली होती. त्यांच्या पोस्टवर चौफेर टीका झाल्यानंतर शेखर यांनी महिला पत्रकारांची माफी मागत फेसबुकवरून ती वादग्रस्त पोस्ट काढून टाकली.