Breaking News

काष्टी जनावरे बाजारात मिळणार आरओ फिल्टरचे शुद्ध पाणी


तालुक्यातील काष्टी गावामध्ये शनिवारी आठवडे बाजार भरतो. महाराष्ट्रातील मोठा नामांकीत जनावरांचा बाजार येथे भरतो. या बाजारामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापार्‍यांसह कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी येतात. त्यामुळे काष्टी मधील जनावरांचा बाजार हा देशात प्रसिद्ध आहे. मात्र काष्टी हे गाव घोड नदी तीरावर असल्याने विहीर, बोअरचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल अपष्टा सहन कराव्या लागतात. जनावरेदेखील याठिकाणचे पाणी कमी प्रमाणात पित असत, त्यामुळे बाजार समितीचे संचालक मंडळाने निर्णय घेऊन बाजारामध्ये आर. ओ. फिल्टर सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.आर. ओ. फिल्टर द्वारे शेतकरी, व्यापारी यांना पिण्यासाठी एक लिटर पाण्यासाठी नाममात्र 1 रुपयाप्रमाणे आकारणी करण्यात येणार असुन जनावरांसाठी प्रती 20 लिटर पाण्यासाठी 5/- रुपये आकारणी केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी दिली.