Breaking News

बिटकॉईनची ऑनलाईन खरेदी बंद


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बिटकाईनची होणारी ऑनलाईन खरेदी बंद करण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली असून, यापुढे कुणालाही ई-वॉलेट, नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट क ार्डच्या माध्यमातून बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीची खरेदी करता येणार नाही.याबाबत आदेश जारी केले आहेत. तर रिझर्व्ह बँक स्वतःचीच डिजीटल करन्सी जारी करण्यासाठी एका सल्लागार समितीची नियुक्ती केली आहे बिटकॉईन खरेदीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार आणि फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आरबीआयने हे निर्देश दिले. सर्व ई-वॉलेट कंपन्या आणि बँकांना या व्यवहारासाठी मनाई करण्यात आली आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मदत होईल, असे रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट मत आहे.