डॉ. तनपुरे कारखान्याची आज गळित हंगाम सांगता
राहुरी ता. प्रतिनिधी - डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१७-१८ गळित हंगामाची यशस्वीपणे सांगता होत आहे. त्यानिमित्त उद्या {दि. २} सकाळी अकरा वाजता आ. शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थिती लकारखान्याचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चेअरमन उदयसिंह पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, की कारखान्याच्या सभासद बांधवानी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सत्ता दिली. कारखाना सुरू करण्यासाठी अनंत कठीण अनंत अडचणी पार करत दि. ९ डिसेंबर २०१७ ला गळित हंगामाचा शुभारंभ झाला. हंगाम सुरू झाल्यानंतरही तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या यंत्रसामुग्रीशी झुंज देत कामगारांनी दि. ३१ मार्च २०१८ अखेर २ लाख १९ हजार ९०९ टन उसाचे गाळप केले. डॉ. सुजय विखे यांचे शिस्तबद्ध व दूरदृष्टी असलेल्या नियोजनाची संचालक मंडळाने काटेकोरपणे अंमलबजावणी करून हंगाम यशस्वी केला.
कारखाना सुरु करण्यासाठी राधाकृष्ण विखे, आ. शिवाजी कर्डिले, डॉ. सुजय विखे यांनी तसेच गळित हंगाम यशस्वी होण्यासाठी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी व कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले आहे. या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सांगता समारंभ कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी सभासद, बिगर सभासद शेतकरी, हितचिंतक, कामगार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन पाटील यांनी केले आहे.