Breaking News

आरटीओच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी वाघ


राहुरी प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने मागील वर्षी ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत राहुरी स्टेशनरोडवरील दत्तनगर येथील प्रितम अमर वाघ यांनी घवघवीत यश प्राप्त केले. 

शनिवारी {दि. ३१ } रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. त्यात त्यांची सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक म्हणून निवड करण्यात आली. सध्या ते इंजिनिरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वाघ यांना देवेंद्र वराळे, सुधीर वने, अमोल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल वाघ यांचे अनेकांनी अभिनंदन केले.