Breaking News

कष्टकरी- कर्तृत्ववान महिलांना “पद्मकन्या”तर सामाजिक संस्थांना“कार्यरत”पुरस्कार जाहीर


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पद्मशाली समाजातील १० कष्टकरी व कर्तृत्ववान महिलाना पद्मकन्या पुरस्कार तर सामाजिकसंस्था व संघटनानाकार्यरत पुरस्कारपद्मशाली समन्वय संघम व पद्मकन्या समितीच्या वतीने जाहीरकरण्यात आले.रविवार २९ रोजी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहितीमहिला महोत्सवाचे स्वागताध्यक्ष जितेंद्र वल्लाकट्टी व निमंत्रक सामाजिक कार्यकर्ते प्रा.विठ्ठल बुलबुले, यांनी दिली.

या वर्षी श्रीमती. सुशीला नारायण बुरगुलश्रीमती तारा चंद्रकांत सुरकुटला, श्रीमती. विजयालक्ष्मी दत्तात्रेय गुंडू, श्रीमती. पुष्पाबाई विठ्ठल दिकोंडा, श्रीमती. पार्वती विजय म्याना,श्रीमती. आशा परशुराम दोमल, श्रीमती. ललिता शिवाजी बल्लाळ, सौ. मीरासतीश नराल, सौ. सुवर्णा अभय पुलगम, कु. रसिका राजू म्याना या माता बहिणींची पद्मकन्या पुरस्कारासाठी निवड झाली तर श्री श्रमिक बालाजी देवस्थानम, पद्मशाली स्नेहीता संघम,पद्मशाली युवजन संघम,पद्मशाली युथ फौंडेशन, पद्मशाली युवाशक्ती, पद्मशाली सोशल फौंडेशन, स्त्री जन्माचे स्वागत समिती, गुरुवर्य पोटयान्ना बत्तीनशैक्षणिक सामाजिक मंडळ, मार्कंडेयपत संस्था व लक्ष्मी पत संस्था या संस्था व संघटनांना कार्यरतपुरस्कार देण्यात येणार असल्या बाबत तिरमलेश पासकंटी, श्रीकांत वंगारी, प्रकाश कोटा, अजय लयचेट्टी, यांनी माहिती दिली दिली.

रविवार दि२९-४ -२०१८ रोजी सांय.५ वा दातरंगेमळा येथील मार्कंडेय संकुल येथे होणाऱ्या या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणारयावेळी प्रमख अतिथी म्हणून चंद्रपूर येथील शिक्षण क्षेत्रात व बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ.रुपाली बोम्मावार, राज्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागभूषण दुर्गम, नगरसेवक मनोज भाऊ दुलम, वीणाताई बोज्जा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत