Breaking News

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या नगर शाखेच्यावतीने येत्या रविवार दि. 29 एप्रिल 2018 रोजी मिस्कीनरोड,जॉगिंगपार्क समोरील निरंकारी सत्संग भवन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले असून, शिबीर सकाळी 10ते दु. 2 वाजेपर्यंत चालणार असून, शिबीराचे उद्घाटन डॉ.बापूसाहेब कांडेकर यांच्या हस्ते करण्यात येईल. याप्रसंगी डॉ. टी.के.नागदेव, मंडळाचे झोनल इन्चार्ज हरिष खुबचंदानी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर शिबीरात हुबळी येथील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट व डायबिटोलॉजिस्ट डॉ.पुरुषोत्तम अरोरा व त्यांच्या सोबतकोल्हापूर, बार्शी, इचलकरंजी, गडहिंगलज येथून आलेले तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करतील. यात हृदयरोग, मधुमेह,दमा, अस्थिरोग, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, स्त्री रोग, बालरोग आदि आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात येईल तसेचईसीजी, बीपी, रक्त, एचबी, लघवी आदिंंची तपासणी करुन रुग्णांना मोफत औषधे दिली जातील. याप्रसंगी आयुर्वेद वहोमिओपॅथी तज्ञ सुद्धा उपस्थित राहतील. रुग्णांनी येतांना आपल्या आजाराशी संबंधीत पूर्वीचे कागदपत्रे घेऊन यावीत.

तरी गरजू रुग्णांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने करण्यातआले आहे. अधिक माहितीसाठी आनंद कृष्णानी (मो.9822429694), अनिल टकले (मो.9822959791) यांच्याशी संपर्कसाधावा.