Breaking News

शिर्डी नगरपालिकेला पुन्हा एकदा दणका


अहमदनगर ते मनमाड राज्य महामार्गावरील खंडोबा मंदिर कॉम्प्लेक्स हे दोन मजली व्यापारी संकुल पाडण्यात अपयशी ठरलेल्या शिर्डी नगरपालिकेला पुन्हा एकदा दणका बसला. सदर व्यापारी संकुल पाडण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश हायकोर्टाने गुरुवारी दिले. तसेच ही कार्यवाही करण्यात दिरंगाई झाल्यास नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात येईल, असे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. सुनील कोतवाल यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. ३ मे रोजी प्रकरणात सुनावणी होणार आहे.व्यापारी संकुल २००५ साली बांधण्यात आले होते. त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. नगरपालिका आणि कंत्राटदार यांनी राज्य महामार्गाची नियंत्रण रेषा व इमारत रेषा यामध्ये आलेल्या भागाचा वापर, वाटप, विल्हेवाट आणि विक्री करू नये. पालिकेने इमारत पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असेही निर्देश खंडपीठाने दिले होते