Breaking News

साईअरिहंत पतसंस्थेला १ कोटीचा नफा


शिर्डी : शहरातील श्री साई अरिहंत पतसंस्थेला ३१ मार्च २०१८ अखेर १ कोटी ३ लाख रुपये नफा झाला. संस्थेकडे ७२ कोटी ३९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळावा, म्हणून ४६ कोटी ७३ लाख रु. चे कर्ज वितरण केले आहे. ४६ कोटी १२ लाख रु. ची सुरक्षित गुंतवणूक केली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल ३ कोटी ५४ लाख आहे. १३ कोटी १० लाखाची वसुली झाली असून नोटबंदीच्या काळात बाजापेठेतील मंदी असे असतानाही सभासद ठेवीदार यांच्या जोरावर संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे, अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन सतीश शामलाल गंगवाल, व्हा. चेअरमन संजय भिकचंद संकलेचा यांनी दिली.