Breaking News

निकाली कुस्त्यांनी भाविनिमगाव यात्रोत्सवाची उत्साहात सांगता


शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील भवानी (जगदंबा) माता देवस्थानचा चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर मुख्य आकर्षण असलेल्या रहाड कार्यक्रम व पालखी (छबिना) मिरवणूक व हजेर्‍यांचा कार्यक्रम यात्रा कमेटीच्या नियोजनाने शांततेत पार पडला. तर दुसर्‍या दिवशी येथील प्रसिद्ध असलेल्या कुस्ती स्पर्धेत (हगामा) निकाली कुस्तीने नामवंत पहिलवानांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. 

हगाम्यास जिल्हा स्तरीय महीला कुस्ती खेळाडू प्रेरणा शेरे हीने भेट दिली. या खेळाडूंचा यात्रा उत्सव कमिटीचे वतीने सन्मान करण्यात आला. हगामा पंच म्हणून यावेळी गंगामामा जाधव, शंकर शिंदे, राहुल मरकड, बाळासाहेब मुंगसे, श्रीकृष्ण काळे, दत्तात्रय गायधने यांनी काम पाहिले. तर संपूर्ण यात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी यावेळी प्रथमच युवकांचा सहभाग असलेल्या यात्रा कमेटीत सरपंच पांडुरंग मरकड, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, शाम शिरसाठ, दिपक जरे, मुकेश करवंदे, प्रवीण मरकड, शिवाजी शेळके, दिलीप मरकड, विष्णू मुंजळे, गणेश शेळके, सोपान चेडे यांनी काम पाहिले.