बालसेवा माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
बालसेवा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये विविध चित्रपट गितांबरोबर लावणी, एकांकिका, मुक अभिनय, सोंगाडया, भविष्य सांगणार, भारूड, थापाडया, रिमिक्स गितांवरील डान्स, तसेच शैक्षणिक सामाजिक व रूढी परंपरानुसार प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम सादर केले. वाकी, लोणी, बाळगव्हान या परिसरातील माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाची सोय बहुउद्देशीय संस्था वाकी यांनी केल्यामुळे वाकी, लोणी, बाळगव्हान परिसरातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कलाकारांचे तोंडभरून कौतुक केले.या कार्यक्रमाप्रसंगी रंगमंच आणि प्रतिमा पूजन सातेफळचे संरपच गणेश लटके यांनी केले. यावेळी वाकी गावच्या संरपच सुमनताई पौडमल, सुरेश लंगडे, आसाराम सावंत, शेळके गुरूजी, चेअरमन आण्णा सावंत, सचिव सुनिल शेळके, संभाजी सुरवसे, ब्रम्हदेव कोळेकर यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यास्नेह संमेलन कार्यक्रमाप्रसंगी लोकवर्गणी मोठ्या प्रमाणात जमा झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सह शिक्षक विकास पाचारणे यांनी तर, आभार मुख्याध्यापिका विद्या फडतारे यांनी मानले.