Breaking News

स्थायीची सभा रद्द होण्यास मुख्याधिकारीच जबाबदार : नगराध्यक्षा रोहिणी शिंदे


कराड पालिकेच्या स्थायी समितीची सभा दि.2 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. मात्र सदरची सभा गणपूर्ती अभावी रद्द करावी लागली ही बाब खरी आहे. पंरतु जनशक्ती आघाडीने दिलेला विषय मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी विषय पत्रिकेवर न घेतल्यामुळेच त्या आघाडीच्या सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यास सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार असल्याचे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.
नगराध्यक्षांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्थायी समितीचा अजेंडा माझ्या केबिनमध्ये फायनल करून नगरपरिषदेचे मिटींग क्लार्क व वरिष्ठ अधिकारी , मुख्या धिकारी यांच्या दालनात सदरचा अजेंडा घेवून गेले होते. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी जनशक्ती व लोकशाही आघाडी या सर्वांनी सुचवलेले शहरातील विकासाचे विषय घेण्यात आलेले होते. मुख्याधिकारी यांचे दालनात सदर अजेंडयामधील काही विषय मुख्याधिकार्‍यांनी स्वतः बाजूला काढलेले आहेत. यामध्ये माझा काहीही संबंध नाही. यामुळेच नाराज झालेल्या जनशक्तीने सदर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. ही बाब जनशक्ती आघाडी व मुख्याधिकारी यांच्यामधील अंतर्गत वाद आहे. यामध्ये मी नगराध्यक्षा म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही.
याबाबत उपनगराध्क्ष जयवंतराव पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये नगराध्यक्षांच्यावर आमचा अजिबात रोष नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी व जनशक्ती आघाडीमध्ये बेबनाव असल्याची जी वावडी उठली आहे ती अत्यंत निरर्थक असल्याचे नमूद करून पूढे म्हटले आहे की, लोकशाही आघाडी ने जे पत्रक काढले आहे ते अपुर्‍या माहितीच्या आधारे काढलेले आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या मजकुराचा व उपस्थित केलेल्या मुद्यांची उत्तरे त्यांना देखील माहिती आहेत. कारण नगरपरिषदेच्या क ोणत्याही मिटींगमध्ये घेण्यात येणारे विषय हे शहरातील विकासाच्या दृष्टीने महत्वाचे विषय असतात. यापुढील स्थायी समितीची मिटींग लवकरच घेण्यात येईल. मागे काय घडले यावर चर्चा करण्यापेक्षा भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.