Breaking News

बुलडाणा शहरातील पथदिवे येत्या दोन दिवसात सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

बुलडाणा,(प्रतिनिधी): बुलडाणा शहरातील बंद असलेले पथदिवे येत्या दोन दिवसात सुरू करण्याबाबतचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बुलडाणा शहर अध्यक्ष दत्ता काकस यांचे नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. शहरातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्यात नगर परिषद असमर्थ ठरत असून मागील दोन महिन्यांपासून शहरातील मलकापूर ते चिखली रोडवरील पथदिवे बंद असल्यामुळे काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी नागरिकांना होत असलेल्या अडचणी बाबत नगर परिषदेला निवेदनाव्दारे कळविलेले असतांना अद्यापपर्यंत बुलडाणा शहरातील पथदिवे सुरू झालेले नाही. दि. 02 एप्रिल 2018 रोजी सदर्हू पथदिवे सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन नगर परिषदेने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत पथ दिवे सुरू झालेले नाही.

बुलडाणा शहराचे आराध्य दैवत माता जगदंबा, माता जगदंबा चैत्र उत्सवात महिला,लहानमुले, जेष्ठ नागरिक, शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातून भाविक-भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. सदर्हू रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे येणार्या भाविक-भक्तांना पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले आहे. दरम्यानच्या काळात अंधाराचा फायदा घेऊन चोर्यांंची प्रकरणे सुध्दा जास्त घडत असून शहरातील नागरिक भयभीत झाले आहे.
दि. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुलडाणा शहरात मलकापूर ते चिखली रोड या मुख्यरत्यावर शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन साजरी करीत असतात. जयंती उत्सवात अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंठक अनु चित प्रकार घडवून आणू शकतात असेही निवेदनात म्हटले आहे. बुलडाणा शहरातील नागरिकांची होत असलेली हेळसांड, महिला व लहान मुलांचे सरंक्षणाच्या दृष्टीने तसेच जयंती उत्सव लक्षात घेता येत्या दोन दिवसात बुलडाणा शहरातील पथदिवे सुरू न झाल्यास सदर्हू पथदिव्यांवर टेंभा आंदोलनाचा निवेदनात प्रशासनाला इशारा दिलेला आहे. या प्रसंगी सर्वश्री नगरसेवक आकाश दळवी, शेख आसिफ, विनोद बेंडवाल, बबलु मावतवाल, रियाज ठेकेदार, चंद्रकांत चव्हाण, नितीन राऊत, निखील चाफेकर, शुभम देशमुख, उमेश देशमुख, आबित कुरेशी, कैलास पुरभे, पल्लु गाढेकर, प्रशांत गायकवाड, शेख मुज्जदीन, बंटी साळवे, गौतम इंगळे, अमिन टेलर यांच्या सह शहर काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.