कुळधरणला रसवंतीगृहांचा व्यवसाय तेजीत
उन्हाळा सुरू झाल्याची चांगलीच जाणीव होण्यास सुरूवात झाली आहे. उन्हाळा चांगला जाणवत असताना उन्हाचे चटके वाढू लागल्याने लोकांचे पाय रसवंती गृहांकडे वळू लागल्याचे चित्र कुळधरणमध्ये दिसु लागले आहे. उन्हाळा सुरु होताच रस्त्यालगत रसवंतीगृहे थाटण्यात आली. आज मितीस कोणत्याही मार्गावरून जात असताना रसवंतीगृह आपल्या निदर्शनास येत आहेत. सुरुवातीचे काही दिवस धंदा मंदीत सुरु होता. मात्र आता उन्हाळा मध्यान्हात आल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा परिणाम धंद्यावर झाला असुन गिर्हाईक वाढल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
कर्जत तालुक्याच्या पश्चिम भागातील कुळधरण हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने येथे लोकांची मोठी वर्दळ असते. कापडबाजार, बँका, सेवा संस्था कार्यालये आदींमुळे कोपर्डी, पिंपळवाडी, सुपेकरवाडी, धालवडी, राक्षसवाडी, गुंडाची वाडी आदी भागातील नागरिकांची याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारचा या भागातील सर्वात मोठा आठवडे बाजार येथे भरतो. छत्रपती शिवाजी चौकात लोकांची नियमित वर्दळ असल्याने येथे अनेक व्यवसाय चांगले चालतात.उन्हाळ्यात येथे अनेकांनी रसवंतीगृहे सुरु केली आहेत. घुंगराच्या आवाजात दिवसभर येथे ग्राहकांची रेलचेल असते. कुल्फी, आईसक्रीमपेक्षा उसाच्या रसाला अधिक मागणी असल्याने रसवंतीगृहे गर्दीने फुलून गेली आहेत.
आईस्क्रीम, रासायनिक शितपेय पिण्यापेक्षा नागरिक आजमितीस उसाच्या रसास पसंती देताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील यात्रोत्सव, जत्रांमध्ये विविध ठिकाणी रसवंतीगृह थाटलेली दिसत आहेत.
उन्हाळा सुरू झाल्याची चांगलीच जाणीव होण्यास सुरूवात झाली आहे. उन्हाळा चांगला जाणवत असताना उन्हाचे चटके वाढू लागल्याने लोकांचे पाय रसवंती गृहांकडे वळू लागल्याचे चित्र कुळधरणमध्ये दिसु लागले आहे. उन्हाळा सुरु होताच रस्त्यालगत रसवंतीगृहे थाटण्यात आली. आज मितीस कोणत्याही मार्गावरून जात असताना रसवंतीगृह आपल्या निदर्शनास येत आहेत. सुरुवातीचे काही दिवस धंदा मंदीत सुरु होता. मात्र आता उन्हाळा मध्यान्हात आल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा परिणाम धंद्यावर झाला असुन गिर्हाईक वाढल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
कर्जत तालुक्याच्या पश्चिम भागातील कुळधरण हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने येथे लोकांची मोठी वर्दळ असते. कापडबाजार, बँका, सेवा संस्था कार्यालये आदींमुळे कोपर्डी, पिंपळवाडी, सुपेकरवाडी, धालवडी, राक्षसवाडी, गुंडाची वाडी आदी भागातील नागरिकांची याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारचा या भागातील सर्वात मोठा आठवडे बाजार येथे भरतो. छत्रपती शिवाजी चौकात लोकांची नियमित वर्दळ असल्याने येथे अनेक व्यवसाय चांगले चालतात.
उन्हाळ्यात येथे अनेकांनी रसवंतीगृहे सुरु केली आहेत. घुंगराच्या आवाजात दिवसभर येथे ग्राहकांची रेलचेल असते. कुल्फी, आईसक्रीमपेक्षा उसाच्या रसाला अधिक मागणी असल्याने रसवंतीगृहे गर्दीने फुलून गेली आहेत.
आईस्क्रीम, रासायनिक शितपेय पिण्यापेक्षा नागरिक आजमितीस उसाच्या रसास पसंती देताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील यात्रोत्सव, जत्रांमध्ये विविध ठिकाणी रसवंतीगृह थाटलेली दिसत आहेत.