Breaking News

दुधोडी, कोळवडी, नेटकेवाडी शाळेस फर्निचर भेट


कर्जत तालुक्यातील दुधोडी, कोळवडी, नेटकेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळांना राशिनच्या वासुदेव फर्निचरचे मालक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मेघराज बजाज यांच्या वतीने फर्निचर भेट देण्यात आले.यामध्ये टेबल, कपाट, खुर्च्या, चप्पलस्टँड अशी भेट शाळांना देण्यात आली.

कोळवडी शाळेत शाळा व व्यवस्थापन समितीच्या वतीने मेघराज बजाज यांचा सत्कार करण्यात आला. नेटकेवाडी शाळेत मुख्याध्यापिका कुंदा झेंडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कजलीचंदा नेटके, उपाध्यक्षा लक्ष्मी भोसले, माजी सरपंच छाया सुनील शेलार, शिक्षिका शितल भोसले यांच्या वतीने सत्कार झाला.उपसरपंच राजश्री धांडे, बापुराव धांडे, अंबर भोसले आदी उपस्थित होते. कोळवडीत मुख्याध्यापिका किरण मुळे, आबा सुर्यवंशी, व्यवस्थापनचे अध्यक्ष संतोष कवडे, उपाध्यक्ष राहुल नवले, धनराज कवडे, अनिल क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य धनराज कवडे, पांडुरंग कवडे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी वासुदेव फर्निचरच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपदेखील करण्यात आले.