सोबलेवाडी येथे अखंड त्रिदिनी नाम जप, हनुमान जन्मोत्सव
पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे सालाबादप्रमाणे गुरूवर्य ह.भ.प.वै. नाना महाराज वनकुटेकर यांच्या कृपाआशीर्वादाने होत असलेल्या सोबालेवाडी येथिल अखंड त्रिदिनी नाम जप व संतकवी महिपती महाराज मुर्ती प्राणप्रतिषठा पाचवा वर्धापन दिन सोहळा सोबलेवाडी तरुण मंडळ व मुंबईकर मंडळाच्या सहकार्याने उत्साहात पार पडला. सकाळपासुनच अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काल सकाळी 11.30 वा. हभप. बाळकृष्ण कांबळे महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले.
पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी किर्तनाचा लाभ घेतला. हभप. बाळकृष्ण महाराजांनी याप्रसंगी कृष्ण लीला या विषयी कीर्तन रुपी सेवा दिली. यावेळी ते म्हणाले की, अन्न ग्रहण करण्यासाठी तीन ठिकाण महत्वाचे देव, आई, महाराज यांचेकडून मिळालेल्या अन्नाने मनशांती व पुण्य लाभते. गेल्या 9 वर्षांपासून या अखंड त्रिदिनी नाम जप सप्ताह सोबलेवाडी तरुण व मुबईकर मंडळ यांनी सुरु केलेल्या या परंपरेचे बाळकृष्ण महाराज यांनी कौतूक केले. आजच्या तरुण पिढीचे बदलते स्वरूप व सोबलेवाडी येथील तरुणांनी घेतलेला हा वसा यामुळे महाराष्ट्रातले अनेक तरुण यामुळे प्रेरित होतील असे त्यांनी बोलताना सांगितले.
गेले तीन दिवस चालणार्या या सप्ताहास महाराष्ट्रातून कीर्तनकार व प्रवचनकार यांनी सप्ताहमध्ये ज्ञानरूपी सेवा पुरविण्याचे काम केले. मुंबईस्थित उद्योजक भाऊसाहेब सोबले, राजेंद्र सोबले, दत्तात्रय शेरकर, विश्वास शेळके, पंढरीनाथ चेमटे, नाना सोबले, ज्ञानदेव म्हस्के, वैभव म्हस्के, राजू शेरकर, बाळासाहेब सोबले, मच्छिंद्र शेळके, राकेंद्रा शेरकर, सुरेश शेरकर, दत्तू शेरकर, रामगिरी गोसावी, कैलास गोसावी, संतोष सोबले यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.