Breaking News

गाळयुक्त शिवार योजना कामाचा गोटेवाडीत प्रारंभ


सोलापूर, दि. 30, एप्रिल - गावचा तलाव शेतकरी, नागरिकांसाठी पाण्याचे चांगले स्रोत असतो. जादा पाणी साठ्यासाठी तलावाची उंची वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, असे सांगत तलावातील गाळ काढल्याने त्याचा जास्तीत फायदा परिसरातील शेतकर्‍यांसाठी होणार आहे. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन बोअर व विहिरींचीही पाणी पातळी वाढणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.

अनुलोम व ग्रामपंचायतीच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून गोटेवाडी येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी शिंदे म्हणाले, 150 प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, 22 ठिकाणचे काम सुरू झाले आहे. तळ्यातील गाळ शेतकर्‍याला स्वतःच्या वाहनातून वाहून नेण्याची व्यवस्था शासन करत आहे. सहा गावांतील गाळ काढण्यासाठी मंजुरी आहे.