Breaking News

शाळांतील शिक्षकांचे वेतन मार्चपासून थकीत; अधिकार्‍यांचे दुर्लक्ष



सोलापूर, दि. 30, एप्रिल - महापालिका शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या शाळांतील शिक्षकांचे वेतन मार्चपासून थकीत आहे. शिक्षक आणि शिक्षक संघटना वेतनासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. परंतु, प्रशासनाधिकारी आणि शिक्षण संचालक एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे शिक्षकांची कुचंबणा होत आहे. 

शिक्षण मंडळात सरासरी 300 शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी कार्यरत आहेत. या शिक्षकांना शासनाकडून 50 टक्के व पालिकेकडून 50 टक्के रक्कम वेतनापोटी दिली जाते. शासनाच्या शिक्षण विभागाकडून तांत्रिक कारण सांगत प्रत्येक महिन्याला वेतन थकीत ठेवण्याचा घाट घातला जात आहे.शासनाकडील 50 टक्के रक्कम शिक्षण मंडळास अद्याप मिळाली नाही. मागील 8 दिवस सतत पुणे उपसंचालक कार्यालयाशी विचारणा करत आहोत. वेगवेगळी कारणे दिली जात आहेत.  5 मेपर्यंत वेतन न झाल्यास सामूहिक रजा टाकून पुणे कार्यालयातील संबंधित अधिकारी यांना घेराव घालून तिथेच उपोषणास बसणार आहोत - अमोल भोसले, सचिव, मागासवर्गीय शिक्षक संघटना