ग्रामस्वराज अभियानामुळे लोकांचा सहभाग वाढला - शिवाजी जगताप
सोलापूर, दि. 30, एप्रिल - ग्रामस्वराज अभियानामुळे लोकांचा सहभाग वाढला. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचत आहेत, असे मत उप जिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचा यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्राम स्वराज दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून उपजिल्हाधिकारी जगताप बोलत होते.
उपजिल्हाधिकारी जगताप म्हणाले, कृषी, बॅकिंग, पुरवठा विभाग, घरकुल अशा विविध योजना या अभियानाच्या कालावधीत लोकापर्यंत पोहचल्या. लोकांना देखील अभियान काळात मिशन मोडवर योजना प्रभावीपणे राबविणेसाठी प्रयत्न केले. अशा प्रकारे प्रत्येक योजनेत लोकांचे सहभाग हवा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी 14 एप्रिल पासून ते 5 मे पर्यंत राबविलेल्या व राबविणेत येणारे उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात दिली. ग्राम स्वराज अभियानामुळे लोकामध्ये जागृती होत आहे. केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.
