हनमंतगावात किर्तनाचे आयोजन
सात्रळ : राहाता तालुक्यातील हनमंतगाव येथे ग्रामदैवत चाँद खानबाबा यात्रेत समाजप्रबोधनकार ह. भ. प. इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील यात्रेत दरवर्षी तमाशा, ऑर्केस्ट्रा असे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्याचा प्रघात आहे. पण मनोरंजनाच्या नावाखाली चालणारा धांगडधिंगा तरुणांची डोके फिरवितो. यामुळे बाचाबाची, दगडफेक असे प्रकार घडतात, त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भागवत पाटील यांच्या नेतृत्वाखालील यात्रा कमिटीने तमाशाऐवजी किर्तन किंवा समाजप्रबोधनपर कार्यक्रम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी {दि. २६ } हनमंतगावचा यात्रौत्सव आहे. त्यानिमित्त संदल मिरवणूक निघणार असून दारूची भव्य आतषबाजी होणार आहे. रात्री ९.३० वाजता समाजप्रबोधन कार्यक्रम होणार आहेत.
Post Comment