Breaking News

निधाने खूनप्रकरणी हॉटेल मालकांसह आठ आरोपींवर गुन्हा दाखल


प्रतिनिधी । राहाता - येथील रामदास निधाने खून प्रकरणी राहाता पोलीसांनी शनिवारी {दि.२१ } आठ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. यात आरोपींची संख्या आतापर्यंत १२ झाली आहे. दरम्यान, आज अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने या आरोपींचा जामीन नामंजूर करत १४ दिवसांची नायालयीन कोठली दिली. 

येथील हॉटेल शिवनेरीमध्ये झालेल्या रामदास निधाने खून प्रकरणात हॉटेलचे मालक विजय सदाफळ यांची मुलगी प्रियंका मंगेश कोते हिचा समावेश आहे. तर सीसीटीव्ही विक्री व दुरुस्ती करणारे दिनेश श्रीराम मंटाला व त्यांचा कामगार सुधीर जनन्नाथ कार्ले यांचा सामावेश आहे. या तीनही आरोपींविरुद्ध पुरावा नष्ट करणे, फरार आरोपींना आश्रय देणे, आरोपी परागंदा करणे व अटकेपासून वाचविणे यानुसार २०१ आणि २१२ आदी कलमे लावण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त पोलीसांच्या रडारवर हॉटेल मालक विजय पुंडलीक सदाफळ, पत्नी कुसुम विजय सदाफळ, त्यांचे जावई मंगेश बाबासाहेब कोते, महेश बाबासाहेब कोते, मुलगी सोनम महेश कोते हे पाच आरोपी आहेत. तर संकेत ज्ञानेश्वर चांदगुडे (रा.कोळपेवाडी ) व सचिन जनार्धन मोरे (रा.आडगाव भुद्रुक) हे दोन आरोपी फरार आहेत. यातील संकेत चांदगुडे यास अटक केल्यानंतर घटनेचा बराच उलगडा होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. सीसीटीव्ही कॅमेरा विक्री व दुरुस्ती करणारे दिनेश मंटाला यांस मंगेश कोते याने दूरध्वनी करुन कामगारास नवीन हार्डडीक्स घेऊन बोलावले होते. त्यानुसार दिनेश मंटला व सुधीर कार्ले दि.1१५ रोजी नवीन हार्डडीक्स घेऊन गेले. त्यावेळी डीव्हीआरमधील जुनी हार्डडीक्सअगोदरच काढून घेतलेली होती. मंटला व कार्ले यांनी नवीन हार्डडीक्स बसून दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. संकेत ज्ञानेश्वर चांदगुडे हा आरोपी अटक झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.