रस्ता डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे काम : राळेभात
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील राज्य मार्ग क्रमांक 57 पासून गोलेकर वस्ती ते सिताराम गड हा आमदार निधीतील 65 मिटर चा रस्ता खर्च आराखडयाप्रमाणे न होता निकृष्ट दर्जाचे काम करून बील लाटण्याच्या तयारीत असणार्या ठेकेदाराविरोधात स्थानिक नागरिकांनी व राजकीय स्थानिक नेत्यांनी काम चांगले करण्यात यावे यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा गावाकडे जाणार्या राज्य मार्ग क्रमांक 57 शी जोडून सिद्ध संत सिताराम बाबा यांचे गडाकडे गोलेकर वस्ती मार्ग 65 मिटर अंतराचा रस्ता खडीकरण, डांबरीकरण अशा सर्व उपयुक्त दर्जाप्रमाणे एकुण 26 लाख रुपये इतकी रक्कम रस्त्यावर खर्चासाठी मंजूर असताना, तसेच त्याचे इस्टीमेट ठरले असताना व मोठी रक्कम मंजूर असूनदेखील हे काम घेतलेले ठेकेदार या रस्त्याचे काम बजेटप्रमाणे न करता चुकीच्या मार्गाने करत असूल असणारे बजट त्यावर पुरेपूर खर्च करत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच बजेटप्रमाणे रस्त्याच्या उंची, रूंदी, खडीकरण, डांबरीकरण यामध्ये मोठी तफावत आहे.
त्याचप्रमाणे रस्त्यात येणारा छोटा पुल त्याची उंची अथवा सरळ न करता विनाकारण वळण घेऊन केलेला आहे. या व इतर अनेक कारणांसंदर्भात गोलेकर वस्तीवरील अनिता गोलेकरसह इतर सर्वांनी यासंदर्भात वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम, तहसिल, जिल्हा अधिकारी आदी सर्व संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रार व पाठपुरावा करूनही कोणीही याकडे लक्ष न देता निकृष्ट दर्जाचे काम व डांबरीकरण तसेच चालू ठेवले असल्याने याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात व स्थानिक गोलेकर भगिनींसह आदींनी दिला आहे.