Breaking News

फळे घेताय जरा जपून !


उन्हाच्या झळा चांगल्याच सुरू झाल्या आहेत, त्याचबरोबर शहरातील प्रत्येक रस्त्यावर कलिंगड, टरबूज विक्री करणारे दिसू लागले आहेत. प्रत्येक चौका-चौकामध्ये टरबूज विक्री करणारे दिसत आहेत. उन्हाचा कडाका वाढल्याने प्रत्येकजण आपल्या घरी जाताना टरबूज घेऊन जात आहे. मात्र हे कलिंगड, टरबूज घरी घेवून जात असताना काही प्रमाणात काळजी घेणेदेखील आवश्यक आहे. कारण हे कलिंगड पिकविण्यासाठी काहीवेळा रसायनांचा वापर केला जात आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे ही फळे घेत असताना काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक बनले आहे.