Breaking News

दौंडमध्ये डोक्यात दगड घालून युवकाची हत्या


पुणे : दौंड तालुक्यातील कासुर्डी गावातील एका युवकाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ एका निर्माणाधीन इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही हत्या झाली आहे. गणेश झुंबर टेमगिरे (वय 19 वर्षे रा. भरतगाव, ता. दौड, जि. पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आदिनाथ विनायक जगदाळे वय 28 वर्षे रा. भरतगाव, ता. दौड) यांनी अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. गणेश हा बुधवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी कासुर्डी टोलनाक्याच्या जवळ असलेल्या जगदाळे अपार्टमेंटमध्ये गणेशचा मृतदेह आढळला.