Breaking News

इंद्राणी मुखर्जीची पती पीटर मुखर्जीला घटस्फोटाची नोटीस


मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने सहआरोपी आणि पती पीटर मुखर्जीला स्पीड पोस्टाने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी सध्या तरूंगात आहेत. इंद्राणीने सामंजस्यातून पीटर मुखर्जीपासून फारकत मिळवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. घटस्फोटाच्या या नोटीसमध्ये स्पेन आणि लंडनमधील संपत्ती, बँकेतील फिक्स डिपॉझिट्स आणि अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांमधील गुंतवणुक यात विभागणी करण्याचा उल्लेख केला आहे. 10 नोव्हेंबर, 2002 साली पीटर आणि इंद्राणीचं हिंदू पद्धतीने लग्न झाले होते.