अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ सोनईत मुक मोर्चा
सोनई प्रतिनिधी - जम्मू काश्मीरमधील आठ वर्षीय आसिफा या चिमुरडीवर झालेल्या निर्घृण अत्त्याचार व हत्त्या प्रकरणी सोनई येथे निषेध करत मुक मोर्चा शिवाजी चौक, नदीपात्र, बसस्थानक या मार्गावरून जाऊन पोलीस ठाण्याचे स. पो. नि. किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सोनई मुक मोर्चात मुस्लिम समाजाच्या वतीने विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते.
यावेळी आसिफाला न्याय देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी करून तीव्र शब्दात अनेक वक्त्यांनी निषेध व्यक्त केला. तशा आशयाचे निवेदन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमशेद सय्यद ,खलील इनामदार, अॅड.जमीर शेख, नजीर सय्यद, फारूक पठाण, संतोष तेलोर , शिवसेनेचे तालुका उपप्रमुख प्रकाश शेटे, अशोक साळवे, दादासाहेब वैरागर, महावीर चोपडा, नासिर शेख, माजी मुख्याध्यापक शेख , बेल्हेकर वाडीचे सरपंच भरत बेल्हेकर यांनी गावाच्या वतीने पाठिंबा दर्शिवला,सुनील पाडळे, मामु शेख यांच्यासह विविध समाजातील संघटना सहभागी होऊन शांततेत मोर्चा काढण्यात आला. शेवटी आसिफला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.