प्रारुप मतदार यादी प्रसिध्द हकरती असल्यास 23 एप्रिलपर्यत सादर करावे
दिनांक 18 एप्रिल 2018 रोजी प्रारुप मतदार यादी संबंधित ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रारुप मतदार यादीवर काही हरकती असल्यास दिनांक 23 एप्रिल 2018 पर्यंत नगर तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सावेडी रोड, अहमदनगर लेखी स्वरुपात सादर करावेत. त्यानंतर दिनांक 25 एप्रिल 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे नगरचे तहसीलदार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.