प्रवरासंगम प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे श्री समर्थ सदगुरू किसनगीरी बाबा , वै.प.प.त्यागीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व.प पु.बाल ब्रम्हचारी महाराज यांच्या मार्गदर्शनाने राजेंद्र महाराज आसने व. पद्मनाथ जाधव महाराज याच्या नेतृत्वाखाली आणि समस्थ ग्रामस्थ भजनी मंडळ श्रीक्षेत्र प्रवरासंगम टोका यांच्या सहकार्याने अखंड हरिमाम सप्ताह उत्साहात पार पडला. सप्ताह दरम्यान अनेक महाराजांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी सप्ताहात अन्नदान तसेच चहा नाष्टा महाराजाच्या सेवा करण्यात आली. तसेच महाप्रसादाचे आयोजन बाळासाहेब पाटील.पाडुरंग काळे (दादा) विलास आगळे , टेकाळे मामा सा.बा.विभाग पुणे तर हिरा पेट्रोल पंपचेदिनकर कदम यांनी रोख रक्कम रु.5000 दिली सर्व पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी सप्ताहात स्वयंस्फुर्तीने आपला सहभाग घेतला.
प्रवरासंगम येथील अंखड हरिनाम सप्ताहाची सांगता
Reviewed by Dainik Lokmanthan
on
01:45
Rating: 5