Breaking News

लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठाणच्या शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद; दोनशे रुग्णांची तपासणी

पारनेर तालुक्यातील पोखरी येथे निलेश लंके प्रतिष्ठाणच्या नूतन शाखेचा शुभारंभ काल विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. एशियन नोबेल हॉस्पिटल प्रा. लिमीटेड अहमदनगर तसेच लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठाण पारनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्णबधीर तपासणी शिबीरामध्ये रविवारी 200 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात 150 कर्णबधीर रुग्ण आढळून आले. किमान 60 गरजू रुग्नांना सहा ते सात हजार रुपये किमतीच्या श्रवणयंत्रांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.


निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आजपर्यंत तालुक्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम गेली अनेक वर्षे प्रतिष्ठाणचे सदस्य अविरतपणे पार पाडत आहेत. त्यात महिला देवदर्शनाच्या माध्यमातुन आजवर हजारो महिलांना देवदर्शन, आरोग्य सेवेच्या माध्यमातुन आजवर हजारो गरीब कुटूंबांना मोफत किंवा अल्पदरात केलेल्या शस्त्रक्रिया, कोठेही आपघात झाल्यावर केवळ 10 मीनीटांमध्ये घटणास्थळी पोहचनारा प्रतिष्ठाणचा कार्यकर्ता, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व त्या मदतीमुळे प्राथमिक शाळेपासुन ते पदवीपर्यंत उच्चशिक्षीत झालेले अनेक तरूण, अनेक बरोजगारांना रोजगार उपलब्ध करून बरोजगारी दूर करण्यासाठी या प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन केलेले कार्य, अनेक निराधारांना आधार यासारखे प्रतिष्ठाणने राबवलेले अनेक उपक्रम महत्वाचे आहेत. लोकनेते निलेश लंके हे राजकारणाविरहीत जे समाजकार्य करतात त्या कार्यास प्रेरित होवून आज तालुक्यातील हजारो तरुण पारनेर तालुक्यात गावोगावी स्वखर्चाने प्रतिष्ठाणची स्थापणा करताना दिसत आहे. पोखरी येथे हेच चित्र पहावयास मिळाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्‍या सर्व सदस्यांचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाप्पु शिर्के यांनी आभार मानले.