नगर । प्रतिनिधी - घर व जागा स्वतःच्या नावावर करुन दिराने फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा राहुल पवार असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. पती राहुल शंकर पवार व दीर मुकुंद शंकर पवार या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझा पती राहुल हा सध्या मानसिक त्रासाने ग्रस्त आहे. या काळात तो घर आणि जागा विकून टाकू शकतो. त्यामुळे तुझी मुले उघड्यावरर येतील. त्यामुळे सदरचे घर आणि जागा माझ्या नावावर कर, असे दीर मुकुंद तिला म्हणाला. त्यामुळे मनिषाने सदरचे घर आणि.जागा त्यांच्या नावावर केली. मात्र त्यानंतर घर आणि जागा मनिषा यांच्या नावावर करण्यास मज्जाव केला. याप्रकरणी मनषिा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.