Breaking News

निळवंडे’साठी निधी उपलब्ध ; विरोधकांची पिपाणी बंद : डॉ. विखे

शिर्डी / प्रतिनिधी - राहता तालुक्यात सर्वच समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. सर्वांची असलेली एकजूट आणि नामदार राधाकृष्ण विखे यांचे पाठबळ यामुळे सर्वाधिक निधी आणून विकासाची कामे सुरु आहेत. विरोधकांना आता काही कामच राहिले नाही. त्यामुळे ‘निळवंडे’ची पिपाणी वाजून कायम राजकारण करणाऱ्यांना ‘निळवंडे’साठी ५०० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे विरोधकांची पिपाणी बंद झाली, अशी मिश्किल टिपण्णी युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी केली.

निमगाव कोऱ्हाळे येथे सावता प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्यावतीने महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. सभापती हिरा कातोरे, सरपंच शिल्पा कातोरे, उपसरपंच अजय जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब कातोरे, माजी सभापती सिताराम गाडेकर, श्रद्धा-सबुरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे आदींसह विविध क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, महात्मा फुले यांचे कार्य फार मोठे आहे. त्यांचा आदर्श समाजासाठी कायमच प्रेरणा देणारा असून आपण सर्वच समाजाबरोबर घेऊन विकासाची कामे करत आलो. निमगाव-कोऱ्हाळे गावाच्या विकासासाठी कायमच पाठीशी आहे. बाह्यवळण रस्ता ते निमसेवाडी रस्ता या रस्त्याचे काम लवकरच सुरु केले जाईल. निघोज ते रुई रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पूर्ण केला जाईल. गावाच्या विकासासाठी सर्वांची एकजूट गरजेची आहे. कामाच्या व विकासाच्या माध्यमातून विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. विरोधकांना काही कामच ठेवले नसल्याचे ते म्हणाले.

पंचायतसमितीचे सदस्य ओमेश जपे, मार्केट कमिटीचे संचालक शरद मते, शिवाजी कातोरे, सिमोन जगताप, वाल्मिक गाडेकर, ग्रामविकास अधिकारी आर. के. गायकवाड, प्रसाद मते, भारत मते, बाळासाहेब गाडेकर, नारायण गाडेकर, कैलास गाडेकर, गोविंद गाडेकर, सोमनाथ गाडेकर, विजय जगताप, जगदीश गाडेकर, सुनील गाडेकर, चांगदेव जगताप आदींसह ग्रामपंचायत सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.