Breaking News

जम्मु काश्मीर , उन्नाव व सुरत घटनेचा भिमशक्ती संघटनेकडुन निषेध


श्रीरामपुर ता. प्रतिनिधी - जम्मु काश्मीर राज्यातील कठुआ व उत्तर प्रदेशातील उनाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन कठुआ येथील 8 वर्षीय मुलीचा अत्याचार करुन खुन करण्यात आला आहे. या प्रवृत्ती मुळे समाजामध्ये महिला व मुलीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होवुन दहशतीचे वातावरण पसरले आहे .भविष्यात अशा घटना घडु नये याकरिता या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी भिमशक्ती संघटनेच्या वतिने करण्यात आली व कोल्हार मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित लावलेल्या फ्लेक्स बोर्डची विटंबना करण्यात आली व संगमनेर तालुक्यातील कनोली या गावात काही जातीयवादी लोकांनी जयंती साजरी करण्यास विरोध केला या घटनेचा जाहिर निषेध करुन श्रीरामपुर शहर, पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शेवाळे यांना जिल्हा अध्यक्ष संदिप मगर व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संदिप अमोलिक तालुका संघटक गोविंद साळवे, शहर उपाध्यक्ष सुनिल सोनवणे , अरुण खंडिझोड , सोमनाथ पटाईत , गुडु पंडित , सागर अमोलिक ,. करण कांबळे रोहित मोरे सुनिल पवार इरफान शेख सचिन प्रधान बाबा पवार शिवदास पवार, अजय कांगुणे, विशाल कदम , श्रीकांत भालेराव, सतिष जगताप ,इरफान पठाण ,संतोष ढाणे, वंसत साठे ,राजेश एनगे आदी उपस्थित होते