Breaking News

जेऊर हैबती जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात


बालाजी देडगाव प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व साद रानपाखरांची हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी जेऊर हैबती येथील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या भुमिपुत्रांचा ग्रामरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार बाळासाहेब मुरकटे , जिल्हा परिषद सदस्या तेजश्री लंघे, अमरावती जातपडताळणी अधिक्षक गुलाबराव खरात, विस्तार अधिकारी शंकर गाले, केंद्रप्रमुख नवनाथ फाटके, दौलतराव देशमुख, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष महेशराजे म्हस्के उपस्थित होते. यावेळी प्रल्हादराव रिंधे,दत्तोबा महाराज रिंधे, प्रा. नारायण म्हस्के, अंबादास खराडे, सोपान ताके, सुभाष महाराज औटी, रेवन्नाथ कानडे, गणेश शेटे, किशोर शिंदे, अर्जून सुसे, अरुण मिसाळ, सटवा फुलमाळी या जेऊर हैबतीच्या भुमिपुत्रांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रामरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध हिंदी, मराठी गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. तसेच समाजप्रबोधपर व देशभक्तीपर नाटीका सादर केल्या. यावेळी उपस्थित पालकांनी बक्षिसांचा वर्षाव केला. यावेळी आण्णासाहेब म्हस्के, संतोष म्हस्के, निवृत्ती म्हस्के, रघुनाथ म्हस्के, बाळासाहेब रिंधे, बापुसाहेब गवारे, उध्दव शिंदे, रामदास खराडे, मिनाक्षीताई रिंधे, कैलास म्हस्के, नानासाहेब खराडे, गुलाब उगले, शरद गरड, भगवान रिंधे, शाहुराव उगले, शंकरराव म्हस्के, शरद शिंदे, किसन ताके, दामोदर रिंधे, शिवाजी रिंधे, रावसाहेब खराडे, शिवाजी कानडे, अशोक ताके, गोऱक्ष कानडे, आणासाहेब जावळे, दिलीप ताके, रुस्तुम भुजबळ, भाऊराव कपिले, गोरक्षनाथ इटकर, राजू पिटेकर, अंकुश पिटेकर, बबन वाघमारे, राधाकिसन घुगरे , महादेव धायगुडे, दिगंबर धनवटे आदि मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष महेशराजे म्हस्के, उपाध्यक्ष अनिल उगले , सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच गावातील विविध तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले.