Breaking News

‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांची ‘बजाज अॅटो’ मध्ये निवड


कोपरगांव: प्रतिनिधी - संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या १४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत बजाज अॅटो लिमिटेड या वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्याच्या कंपनीने नोकऱ्यांसाठी ट्रेनी इंजिनिअर्स म्हणून निवड केली आहे. ही निवड पुल कॅम्पस ड्राईव्ह ऊपक्रमांतर्गत झाली असून या कंपनीने संजीवनीच्या विद्यार्थ्यांची सर्वात जास्त संख्येने निवड संजीवनी उद्योग समुहावर विश्वास दर्शविला आहे. जगाला आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविण्यास ‘संजीवनी’ योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याची पावती आहे, अशी प्रतिक्रिया प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी व्यक्त केली.

या विध्यार्थ्यांचा संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मोठ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी प्रवेश मिळणे महत्वाचे असते. मात्र पुढील यश हे आपण किती प्रामाणिकपणे स्वतःला अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करतो व कशी सेवा देतो यावर अवलंबून असते. यावेळी प्राचार्य मिरीकर विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागचे प्रमुख प्रा. आय. के. सय्यद आदी उपस्थित होते.

बजाज अॅटो लि. या कंपनीने अनिकेत दिघे, महेश शिंदे, सुमित कुऱ्हे, मोहिनी उंदरे, आकाश गोनटे, विशाल जगताप, महेश मैंद, अभिशेक कुर्डे, टीना कुऱ्हे, पायल तारू, प्रतिक बनकर, सुभाष होन व आकाश जेजुरकर आदी विद्यार्थ्यांची निवड केली. दरम्यान, आपल्या पाल्यांच्या निवडीने या विध्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.