Breaking News

वीरभद्र बिरोबा महाराज यात्रौत्सव सोमवारपासून


प्रवरानगर प्रतिनिधी - लोणी खुर्द येथील जागृत देवस्थान श्री वीरभद्र बिरोबा महाराज यातत्रौत्सव येत्या सोमवारपासून {दि. ९ } सुरु होत आहे. दोन दिवस सुरु चालणाऱ्या या उत्सवाच्या नियोजनासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांची नुकतीच बैठक घेण्यात आली.

यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन वसंतराव आहेर, डॉ. हरिभाऊ आहेर, शांतीनाथ आहेर, रामचंद्र आहेर, राजेंद्र घोगरे, दीपक घोगरे, डॉ. सुनील आहेर, संतराम आहेर, गोरक्ष मापारी, शिवाजी कुरकुटे, सचिन आहेर, अशोक कोरडे, बाळासाहेब कोरडे, महादु राऊत, शिवाजी कांदळकर आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये यात्रौत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी संतराम आहेर, उपाध्यक्ष दीपक घोगरे, गोरक्ष मापारी आणि शिवाजी कुरकुटे यांची तर खजिनदारपदी प्रा. शिवाजी कांदळकर यांची निवड करण्यात आली. उत्सव समितीमध्ये रायभान आहेर, संजय आहेर, सचिन आहेर, डॉ. सुनील आहेर, किसन आहेर, सुनील घोगरे, रमेश आहेर, संदीप खर्डे, सुहास घोगरे, प्रविण घोगरे, कचरू कोरडे, महादू राऊत, अशोक कोरडे, दीपक आहेर, दादासाहेब घोगरे, राधू कुऱ्हाडे, किशोर ब्राह्मणे आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.