जागतिक वसुंधरादिन विशेष - वैश्विक तापमाण वाढीस मानवच कारणीभूत...
भविष्याची कल्पना रंगविणे हा मानवाचा स्वभाव गुण आहे. या स्वभावातुन मानवाने स्वत:चा विकास केला आहे. मात्र हा विकास होत असतांना आपली वसुंधरा भकास होऊ लागली आहे, याकडे मानवाने लक्ष दिले नाही. प्रगतीसाठी, उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो मात्र यामुळे आपल्या आसपासच्या पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आज संपुर्ण सजीव सृष्टी विविध प्रदुषणांमुळे प्रभावीत झाली असून त्यामुळे अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ समस्त सजीवांवर आली आहे.
आज वैश्विक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वार्मिंगमुळे आपली वसुंधरा हैराण झालेली आहे. यासाठी आतातरी मानवाने आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी, आपल्या निसर्गांच्या रक्षणासाठी स्वत:हुन काही पाऊले उचलली पाहिजे. कारण या भूतलावर येणारी सर्व पर्यावरणीय संकटे ही मानवनिर्मित असुन त्यास थांबविण्याचे कामही मानवालाच करावे लागणार आहे. आजपासून 48 वर्षांपुर्वी म्हणेच 22 एप्रिल 1970 रोजी पृथ्वीवरील होत असलेला पर्यावरणाचा विध्वंस रोखण्यासाठी पहिला जागतिक ङ्गवसुंधरादिनफ आयोजीत करण्यात आला होता.
काय आहे ग्लोबल वार्मिंग?
विविध नैसर्गिक व मानवी कृतींमुळे भूपृष्ठाच्या व सागरजलाच्या सरासरी तापमानात होणारी वाढ जी सर्व सजीवमात्रांच्या विनाशास कारणीभूत ठरते, यालाच ग्लोबल वार्मिंग किंवा वैश्विक तापमान वाढ असे म्हणतात. पृथ्वी ही अनेक वायुंच्या आवरणांनी आच्छादलेली आहे. ज्यामध्ये नॉयट्रोजन 79 टक्के, ऑक्सीजन 20 टक्के असे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे कार्बनडाय ऑक्साईड व मिथेल या वायुंचेही अस्तित्व आहे. पृथ्वीच्या तापमान वाढीस काही नैसर्गिक कारणे आहेत, तर काही मानवनिर्मित आहेत. वातावरणातील कार्बन वायुंच्या वाढीमुळे सुर्याची उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे मोठया प्रमाणात पोहोचते. हरितगृहामधून मोठया प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड वातावरणात सोडला जातो. त्याचप्रमाणे इंधनाचे ज्वलन, कोळशाचे ज्वलन, शहरातील वाहतुक कोंडी, वाळवंटीकरण, ओझोन वायुचे क्षरण आदी कारणांमुळे तापमान वाढ मोठया प्रमाणात होत आहे. सन 2000 ते 2010 या कालावधीत पृथ्वीची सरासरी तापमान वाढ 0.80 ते 1.35 इतकी झालेली आहे. तापमान वाढीमुळे एक प्रकारे सूर्य आग ओकू लागल्याचे जाणवत आहे. आज एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील तापमानाने 45 अंशाची पातळी ओलांडली आहे. त्यात आणखी वाढतर नक्कीच होईल. मागील काही वर्षे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण वर्षे म्हणून नोंदली गेलेली आहे. याचा परिणाम पृथ्वीवरील सर्व सजीवांसह पर्यावरणावर होत आहे.
ग्लोबल वार्मिंगचे परिणाम
समस्म मानवजात सजीव प्राणी व पृथ्वी यांच्या विनाशासाठी ङ्गग्लोबल वार्मिंगफ हे एक महत्वाचे कारण ठरु शकते, असे शास्त्रज्ञांना आता वाटू लागले आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीवरील सजीवांवर, पिकांवर, हवामानावर झालेले अनेक परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. मोठया प्रमाणात रोगांचा प्रसार होण्यासाठी उष्ण वातावरण पोषक असते. बर्याच ठिकाणी कमाल व किमान तापमानात मोठी तफावत दिसून आल्याने याचा थेट संबंध ग्लोबल वार्मिंगशी जोडला जाऊ लागला आहे. कमला व किमान तापमानात मोठा फरक पडल्याने मानवामध्ये विविध आजार होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे प्लेग, स्वाईन फ्ल्यू यासारख्या अनेक रोगांचा प्रसार होण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत आहे. तापामानवाढीमुळे हिमनद्या वितळीतील व मोठया प्रमाणात पूर येऊन सागरजलाच्या पातळीत वाढ होईल व बहुतांश गोडे पाणी समुद्रास जाऊन मिळेल अशी भिती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे सागरजलाची उष्णता वाढते. ज्यामुळे बाष्पीभवानाचा वेगही वाढेल. याचाच परिणाम म्हणून अनेक भागात अवेळी अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढेल. त्याचप्रमाणे याचा परिणाम या भागतील शेती उत्पादनावर देखील होईल. असे अनेक विध्वंसक परिणाम सर्व सजीवांना मारक ठरतील. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. मानवाने आपल्या व येणार्या भावी पिढीसाठी पर्यांवरण रक्षणासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे.
जल, जमीन और जंगल का रखो खयाल
आज मानवाने निर्माण केलेल्या पर्यावरणीय समस्या गुंतागुंतीच्या व परस्परनिगडीत आहेत. परंतू त्यांची सोडवणूक करणे शक्य आहे, गरज आहे त्या समस्यांना प्रामाणिकपणे समजून घेण्याची व पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नात आपला मोलाचा वाटा उचलण्याची गरज आहे.
वृक्षारोपण व संवर्धन ही आज काळाची सर्वात महत्वाची गरज झालेली आहे. तापमान वाढीस जर कोणी रोखू शकतो तर केवळ वनस्पती. पुर्वी वनांचे प्रमाण जास्त असल्याने वातारवणात गारवा असायचा. अलिकडील 50 ते 60 वर्षांत वृक्षतोडीचे प्रमाण खूप मोठया प्रमाणात वाढले. मात्र त्याप्रमाणात वृक्षारोपण व संवर्धनाचे प्रमाण अत्यल्प आहे. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी किमान 33 टक्के जमीनीचे क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक असते. आज आपल्या भारतात हे प्रमाण सुमारे 20 टक्केच शिल्लक आहे. आज मानवाला वृक्षापासून मिळणारे फायदे प्रत्यक्ष दिसत नसल्याने तो वृक्षांची सरसकट कत्तल करीत चालला आहे. मात्र हेच वृक्ष मानवाचा आधार असून उध्दार करीत आले आहेत व भविष्यातही करीत राहतील. कारखानदारी, वसाहत, वाहतुक व दळणवळण यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केली जाते. औदयोगिकीकरण, खाणकाम, वाहतुकीची वाढलेली साधने आदींमुळे तापामानात वाढ होत चाललेली आहे. वृक्षसंपदा कमी आणि वाहनांची संख्या भरमसाठ वाढल्याने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही लोक चळवळ झाली पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने 50 कोटी वृक्ष लागवडीचे घेतलेले उद्दीष्ट अतिशय चांगला उपक्रम आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यात घातलेले लक्ष व त्यासाठी करीत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. मात्र त्यांचे एकटयाने ते साध्य होणार नाही. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र हरीत सेना ही नवी योजना आणली. त्यात सर्वच महाराष्ट्रातील नागरिकांनी मनापासून सहभागी झाले पाहिजे. दरवर्षी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक रोप लावुन त्याचे संवर्धन जरी केले तरी 12 कोटी रोपांची लागवड व संवर्धन एका वर्षांत होऊ शकते. हे काम मोठे आहे. सहज साध्य होणारे आहे. वनसंपदेचे प्रमाण वाढले तर अनेक पर्यावरणीस समस्या आपोआप सुटतील. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात, शेतात, बांधावर, शासकीय जागेत वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षारोपन व संर्वधन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानला पाहिजे. त्याचप्रमाणे इंधन वापराबाबत सुध्दाविचार केला पाहिजे. दैनंदिन कामातुनही आम्ही तापमान वाढीला रोखू शकतो. मात्र त्यासाठी मनापासुन तयारी झाली पाहिजे.
पर्यावरण संवर्धन हे कोणा एकाचे काम राहिलेले नाही. त्यासाठी सर्वांना त्यात सहभागी व्हावे लागेल. सर्वसामान्य माणूसही खूप काही करु शकतो. किमान स्वत:ला बदलू शकतो. मानवाने स्वत: गरजांना आणि प्रगतीच्या ओढीला योग्य दिशा दिली तरी बर्याच प्रमाणात पर्यावरणीय समस्या सुटू शकतात. ग्लोबल वार्मिंग ही समस्या एखादया देशापुरती अथवा खंडापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ती जागतिक समस्या झालेली आहे. संपुर्ण सजीव सृष्टी ग्लोबल वार्मिंगमुळे होरपळुन निघत आहे. मानवाने निसर्गांवर केलेला प्रत्येक आघात आता परत मानवाकडे येतोय. आणि त्याची जाणीवही मानवाला होत आहे. आता मानवाने पर्यावरणाशी संबंधीत आपली जबाबदारी झटकणे म्हणजे केवळ आत्मघात होईल. म्हणूनच स्वत:पासून सुरुवात केली तर सर्व काही बदलेल.
लतिफ बाल राजे
पारनेर.
मो. नं. 9975699657