भाविनिमगाव प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील स्वस्त धान्य दुकान येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गट चालवत होता मात्र त्यांचा भ्रष्टाचारी कारभार उघड झाल्याने परवाना रद्द करण्यात आला .त्यामुळे नविन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामीण महिला बचत गट , मोहटादेवी महीला स्वयंसहायता बचत गट , शिव आराधना महीला स्वयंसहायता बचत गट , शुभ लाभ महिला स्वयंसहायता महीला बचत गट व तुळजाभवानी महिला स्वयंसहायता बचत गट असे पाच महिला बचत गटांनी आपले अर्ज दाखल केले होते. ते सर्व अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचेकडे पाठवण्यात आले. व पाचही अर्ज नियोजन समिती समोर ठेवले असता नियोजन समितीने या बचत गटांना गुणानुक्रम देण्यात आला त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामीण महिला बचत गटास सर्वाधिक 25 गुण मिळाल्याने या महिला बचत गटास मान्यता देण्यात आली मात्र महिला ग्रामसभेचा ठराव पाहिजे अशी अट ठेवण्यात आली. त्यावर शहरटाकळी येथे महिला ग्रामसभेत राजकारण करून ठराव होऊ न दिल्याने हे स्वस्त धान्य दुकान ग्रामसभेच्या ठरावात अडकले आहे.
महिला ग्रामसभेच्या ठरावात अडकला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:15
Rating: 5