नोटा बदलून देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांना गंडा
हा प्रकार 17 ते 25 एप्रिल या कालावधीत कोंढवा परिसरातील बेकर्स पॉइंट आणि कुबेरा गार्डन परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गफार आणि अन्सारी या दोघांनी फिर्यादींशी संपर्क साधला. शहा नावाच्या एका व्यापार्याकडे 100 रुपयांच्या खूप नोटा आहेत. त्यांना त्याचे रुपांतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटात करायचे आहे. पण आपल्याकडील पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्यास 20 टक्के कमिशन देण्यास तो व्यापारी तयार आहे. त्यापैकी दहा टक्के आम्हाला, दहा टक्के तुम्हाला असे सांगून फिर्यादी आणि मित्रांकडून सात लाख रुपये घेतले.