मोदींनी शेतकर्यांच्या जमिनी लाटल्या असत्या- राहुल रामलीला मैदानावरील जनआक्रोश रॅलीत राहुल गांधींचे टिकास्त्र
यावेळी अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली. भाजपाच्या धोरणांमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. मोदींच्या ना शब्दांत वजन आहे ना त्यांच्या भाषणात पारदर्शकता असते. ते जिथेही जातात तिथे फक्त भाषणे करतात. समाजातील प्रत्येक घटकांची त्यांच्यावर नजर आहे. त्यांनी देशातील कोट्यवधी लोकांची निराशा केली आहे. जिथे संधी मिळेल तिथे भाषण करणारे पंतप्रधान भ्रष्टाचार, महिला, दलितांवरील अत्याचार, बेरोजगारी यावर काहीच बोलत नाहीत. काँग्रेस देशातील शेतकर्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला नसता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जमिनी लाटल्या असत्या, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच शेतकर्यांचे हित साधू शकते. काँग्रेसने नेहमीच शेतकर्यांच्या हिताची भूमिका घेतल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान कर्नाटकमधील सभेत भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा दावा करतात, मात्र त्याचवेळी त्यांच्या मंचावर जेलमधून परतलेले येडियुरप्पा होते म्हणत पंतप्रधानांचे दावे फोल असतात असा घणाघातही राहुल गांधींनी केला.