मुंबई - काँग्रेसने केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियूष गोयल यांच्यावर गंभीर आरोप करत गोयल यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. गोयल यांनी एका खासगी कंपनीतील आपला हिस्सा त्याच्या दर्शनी मूल्याच्या हजारपट अधिक किंमतीने ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनीला विकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत गोयल यांना पदावरून हटवावे व त्यांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, भाजपाने गोयल यांच्या बचावासाठी उडी घेतली असून हा अत्यंत आधारहीन व चुकीचा आरोप असल्याचे म्हटले आहे. गोयल यांनी सप्टेंबर 2014 मध्ये आपले आणि आपल्या पत्नीच्या मालकीच्या कंपनीचे सर्व शेअर्स अजय पिरामल यांच्या कंपनीला दर्शनी मूल्याच्या एक हजार पट अधिक किं मतीने विकली. याची माहिती त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिली नाही. हा व्यवहार गोयल यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर चार महिन्यानंतर झाला होता. पिरामल समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहे. गोयल त्यावेळी वीज आणि अपारंपारिक ऊर्जा मंत्री होते असे काँग्रेसने म्हटले आहे.
पियूष गोयल यांच्याकडून पदाचा गैरवापर आर्थिक अनियमितता केल्याचा काँग्रेसचा आरोप
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:25
Rating: 5