भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाभरात अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. राज्यात सुरु असलेल्या सामाजिक समता सप्ताहाचा आज समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. त्यांच्या विचारांनुसार केलेली वाटचाल ही व्यक्ती आणि समाज दोहोंनाही पुढे घेऊन जाणारी आहे, असे प्रतिपादन केले.
येथील सीएसआरडी महाविद्यालयात आज सामाजिक समता सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. महाजन बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्रा. संजय नगरकर आदींची यावेळी उपस्थिती होती. तत्पूर्वी शहरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. महाजन म्हणाले, डॉ. बाबासाहेब हे एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला. त्यांचे विचार ही सर्वांसाठी प्रेरणा आहे. सामाजिक समतेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक अधिकार बहाल केले. प्रतिभा फुलवण्याची आणि स्वकर्तृत्वाला वाव मिळण्याची संधी डॉ. बाबासाहेबांनी मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येकाने त्यांना मिळालेल्या अधिकारांचा योग्य उपयोग करुन व्यक्ती म्हणून पुढे जाणे आवश्यक आहे, त्याबरोबरच समाज म्हणून पुढे जाणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. महाजन म्हणाले, नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून उन्नतीकडे जाणे आवश्यक आहे.
यावेळी प्रा. नगरकर यांनी त्यांच्या व्याख्यानात डॉ. बाबासाहेबांची जडणघडण, त्यांची जीवनातील वाटचाल, विविध क्षेत्रात त्यांनी केलेले काम, विशेषता अर्थशास्त्र आणि घटनाकार म्हणून केलेले काम याबाबतचे विवेचन केले. डॉ. बाबासाहेबांनी ज्ञानाच्या बळावर उत्तुंग अशी झेप घेतली आणि समाजालाही विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत तसेत स्वाधार योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या विविध लाभार्थींचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी श्री. महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विशेषांकाचेही वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात श्री. वाबळे यांनी या सामाजिक समता सप्ताहानिमित्त दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची तसेच उपक्रमांची माहिती दिली. या कालावधीत विविध ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची तसेच त्याअंतर्गत असणाऱ्या विविध महामंडळांची माहिती जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वसतीगृह तसेच आश्रमशाळा आदी ठिकाणी वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्याचे ते म्हणाले.