Breaking News

‘अमृतवाहिनी’ व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन

संगमनेर : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणार्‍या एमएचटी सीईटी 2018 ही प्रवेश परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी कॉन्फरसिंगद्वारे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली. विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. एम़. ए़. व्यंकटेश यांनी केले़.