Breaking News

गौतम बँकेला ४०.१६ लाख नफा


कोपरगाव ता. प्रतिनिधी - नुकत्याच संपलेल्या सन २०१७ / २०१८ या आर्थिक वर्षात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील गौतम सहकारी बँकेला ४०.१६ लाख नफा झाला. माजी आ. अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे ही बँक तोटामुक्त झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते दिली.

यात म्हटले आहे, माजी खा. कर्मवीर शंकरराव काळेंनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवतांना कारखाना उद्योग समुहाच्या कर्मचा-यांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी व परीसरातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना व्यवसायासाठी तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. मात्र सरकारच्या चुकीचे धोरणामुळे बँकेला ४ कोटी ७९ लाख रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्याचे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी स्वीकारले. बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या सहकार्याने बँकेचे खर्चात काटकसर, कर्ज वसुलीसाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्यात आले.