Breaking News

लिंगायत समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य : काळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आजवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. लिंगायत समाजाला आरक्षण मिळाल्यास बेरोजगार तरुणांना विशेष अर्थसहाय्य मिळू शकते. अल्पसंख्याक मंत्रालयामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभही लिंगायत समाजाला मिळून या बांधवांचा उत्कर्ष होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आगामी काळात या समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य राहील, अशी ग्वाही कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव तहसील कार्यालयात जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी तहसीलदार किशोर कदम, लिंगायत संघर्ष समिती समन्वयक ओमप्रकाश कोयटे, दीपक नीळकंठ, श्रीकांत कोयटे, अमोल साखरे, संदीप कोयटे, दीपक हिंगमिरे, विजय आढाव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनिल शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, कुष्णा आढाव, अजिज शेख, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, निखील डांगे, संदीप सावतडकर, विशाल निकम, विक्की जोशी आदी उपस्थित होते.