कुकाणा ( प्रतिनिधी ) - नेवासा तालवक्यातील नांदुर शिकारी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्य कलाविष्काराला श्रोत्यांनीही ठेका धरत साथ दिली . प्रत्येक नृत्याला उपस्थितांकडून मिळाली दाद व बक्षिसांचा वर्षाव झाला. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन सरपंच शशीकला राजमाने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव लिपणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र नाभिक महामंडळ युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार सुनिल पंडित, निवृत्त मुख्याध्यापक भाऊसाहेब भुसे, रामदास राऊत, विजय आंधुरे, दीपक सरोदे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय घुले यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, लेक वाचवा, लेक शिकवा हा संदेश देऊन भक्तीगीत, कोळी नृत्य, चले हम या सामुहीक नृत्या बरोबरच समाजप्रबोधनपर नाटिका व देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तर प्रत्येक गीताला पालकांनी हजारो रूपयाचे बक्षीस देऊन या चिमुकल्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शिवछत्रपती युवक ग्रुपने विषेश अर्थिक सहकार्य केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रुपच्या पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यापिका सुनिता पाचेगावकर, आशा माने, अध्यापक नामदेव धायतडक, पंढरीनाथ काशिद, लक्ष्मण गायकवाड, अंबादास बोरुडे, गोपाळ राऊत, सचिन लिपणे,अंकुश नवले,रविंद्र पवार आदिंनी विषेश परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अध्यापक नामदेव धायतडक यांनी केले तर सुनिता पाचेगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नांदुर शिकारी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:30
Rating: 5