Breaking News

पथदिवे घोटाळा प्रकरणी तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश

पाथर्डी (प्रतिनिधी) - शहरात पाथर्डी नगरपालिकेने बसवलेल्या पथदिव्यामध्ये घोटाळा झाला असुन त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी 21 एप्रिल रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तहसीलदार नामदेव पाटील यांनी दखल घेत या तक्राराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे पत्र पाथर्डी नगरपालिकेला दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सामजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांचे पत्र मिळाले आहे त्या पत्रात शहरामध्ये सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून पथदिवे बसवण्याचे काम करण्यात आले. सदरचे काम हे मूळ अंदाजपत्रकानुसार न करता मोघमपणे करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी कामे न करताच पूर्वीचेच काम दाखवून बिल काढण्यात आले आहे असे निवेदन दिले आहे. या तक्रारीवरून आपण सदर निवेदनातील मुद्याचा अनुषंगाने 3 मे पूर्वी स्पष्टीकरण देण्यात यावे असे पत्र मुख्याधिकारी यांना तहसीलदार नामदेव पाटील यांना देण्यात आले आहे. तहसीलदार नामदेव पाटील नगरपालिकेला पत्र दिले असता नगरपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर बर्‍याच दिवसापासून गाजत असलेला पथदिवे घोटाळा उघड होणार की नाही याकडे शहराचे लक्ष्य लागले आहे.