दारु पिऊन धिंगाना घालणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबीत
पाथर्डी - (प्रतिनिधी ) - शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या मधुबन हॉटेल येथे पोलीस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे नेमणूक गेवराई पोलीस ठाणे यांनी फुल टू टल्ली होऊन हॉटेल चालक तसेच ग्राहक व पोलीस यांना मारहाण करत रीव्हाल्हरचा धाक दाखवत दबंगगिरी करत धिगाणा केल्याने पाथर्डी पोलिसांनी अमोल मालुसरे यांच्याविरुद्ध 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये 307, 308 या आणखी दोन कलमाची वाढ करण्यात आली असुन त्याला बीड पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले असुन त्याची पोलीस खात्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच गेवराई पोलीस उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांनी शनिवारी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून त्यांनी याबाबत अधिक सखोल चौकशी करत फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाब नोंदवुन घेतले आहेत.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव रोड लगत असलेल्या मधुबन हॉटेल येथे पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे दुपारी 12 वाजल्या पासून दारू पीत होते. त्यांनी जवळजवळ 19 बियरच्या बाटल्या पिण्याचा मनमुराद आनंद लुटला त्यानंतर त्याची धुंदी चढल्यावर रात्री आठ वाजता हॉटेल मालकाने 4500 रुपये बिल मागितले असता त्यानी बिल न देता चिंग झालेल्या अवस्थेत हॉटेल मधुबन येथे धिंगाणा घालायला सुरवात केली यावेळी मालुसरे याने पोलीस असल्याची गुर्मी दाखवत मोठ्या दबंग स्टाईलने समोर येणार्या ग्राहकाला व वेटरला चिंग अवस्थेत मारहाण केली होती. हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांनी लागलीच पाथर्डी पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यामुळे पोलीस कर्मचारी घटना ठिकाणी दाखल झाले परंतु मालुसरे याने आपल्याच खात्यातील पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरवात केली त्यामुळे पोलीस कर्मचारी यांनी वरीष्ठाना कल्पना दिली असता पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर हे सहकार्यासह घटना ठिकाणी दाखल झाले व अमोल मालुसरे यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले परंतु मालुसरे याने त्याचे कडील सरकारी रिव्होल्व्हर टेबलवर आपटून फोडला व पोलीस उपनिरीक्षक पेठकर यांच्या कानाखाली आवाज काढला त्यानंतर उपस्थित जनसमुदायाने व पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानी चिंग पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे यास ताब्यात घेतले.घटनेचे चित्रीकरण हॉटेलच्या सी.सी.टी.व्ही त झाले असून घटने बाबत हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अमोल मालुसरे यांचे विरुद्ध भा.द. वी. कलम 353,323,504,आर्म ऍक्ट नुसार पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता तर यामध्ये आणखी 307 व 308 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे करत आहे