Breaking News

‘प्रवरा’मध्ये राष्ट्रीयस्तरावरील परिसंवादाचे आयोजन


प्रवरानगर प्रतिनिधी  - येथील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथे दि ३ आणि ४ एप्रिल रोजी ‘प्रिसिजन २०१८’ या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक-तांत्रिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पेपर-प्रेझेंटेशन, कॅड-वॉर, सी-कोडींग, लेथ-वॉर, प्रोजेक्ट एक्सजीबिशन (प्रदर्शन), टेक-वॉर, ब्रिज-मेकिंग, चेस, फेस-पेंटिंग, डिबेट, बॉक्स-क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, क्वीज-ऍप्टिट्यूड, पोस्टर-प्रेझेंटेशन, टॉवर-मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली. यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, सुजय विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे, उपप्राचार्य प्रा. विजयकुमार राठी आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.