Breaking News

‘नरेश राऊत फौंडेशन’ विद्यार्थ्यांसाठी संजीवनी : प्रा. गोर्डे


राहाता प्रतिनिधी - ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व्यासपीठ निर्माण करणारी नरेश राऊत फौंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संजिवनी ठरली आहे, असे वक्तव्य संस्थेचे सचिव प्रा. लक्ष्मण गोर्डे यांनी केले. 

ते म्हणाले, की उद्योगपती नरेश राऊत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उभे करुन त्यांना शिक्षणाबरोबरच रोजगार कसा उपलब्ध होईल, अशी संकल्पना राबविण्याची ठरविले. मुंबई येथील उद्योगपती नरेश राऊत यांच्याशी भेट झाली. त्यांनी ही संकल्पना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलवड येथील दुष्काळी भागात २०१३ साली ही संस्था स्थापन करण्यात आली.

ग्रामीण भागातील महिलांनी आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करुन स्वत:च स्वावलंबी व्हावे, यासाठी या फौंडेशनच्या मार्फत महिलांसाठी संगणक प्रशिक्षण, सॅनेटरी नॅपकीन प्रकल्प, ब्युटी पार्लर कोर्सेस, शिवणकाम क्लासेस असे विविध प्रकारचे कोर्सेस फौंडेशनने सुरु केले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मोफत वैद्यकिय सेवा, विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एमएससीआयटी प्रशिक्षण जी व सीईटी या परिक्षांसाठी कोचिंग क्लासेस, फौंडेशनने दत्तक घेतलेले केलवड व जळगांव या गावांसाठी मोफत वाचनालय दुष्काळ काळामध्ये गावचे पिण्याची पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी जलक्रांती अभियानाअंतर्गत या दोन्ही गावांसाठी भरीव निधी अशा विविध प्रकारच्या योजना नरेश फौंडेशन गरजू विद्यार्थी व महिलांसाठी केलवड येथे राबविल्या आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि, प. अध्यक्षा शालिनी विखे, युवानेते सुजय विखे यांनी या फौंडेशनचे अनेकदा कौतुक केले आहे.