Breaking News

बोरा यांच्या पेरूच्या बागेला अचानक आग


लोणी/प्रतिनिधी - राजुरी येथील शेतकरी राजेश मोहनलाल बोरा यांच्या शेतातील पेरूच्या बागेला अचानक आग लागली.त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. राहाता तालूक्यातील राजुरी येथील शेतकरी बोरा यांच्या गट नंबर २०७ यामध्ये असलेल्या ६० ते ६५ पेरूच्या झाडांना दुपारी २ च्या दरम्यान अचानक आग लागली. यामध्ये पेरूची झाडे व त्यामधील ठिबक सिंचन संच जळून गेला. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की उन्हाच्या तीव्रतेमुळे, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत. यामधील पेरूची झाडे व ठिबक सिंचन संच असे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा राजुरी गावाचे तलाठी व कृषी अधिकारी यांनी केला आहे. लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.